viram chinh in marathi : हॅलो मित्रानो मराठी कट्टा या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक मराठी व्याकरण मधील विरामचिन्हे (viram chinh in marathi) व त्यांचे प्रकार, chinha in marathi , swalpaviram in marathi, avtaran chinh in marathi पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षा आणि शाळेतल्या मुलांसाठी हा विषय खूप महत्वाचा आहे, व खूप सोपा देखील आहे. आज आपण विरामचिन्हे व त्याचे प्रकार, पाहणार आहोत आणि आम्ही खाली गृहपाठ ही दिला आहे. चला तर मंग या विषयावर सविस्तर चर्चा करू

विरामचिन्हे म्हणजे काय ? viram chinh in marathi
आपण बोलत असताना वाक्य पूर्ण झाल्यावर थांबतो. एखादा आश्चयाचा उद्गार काढतो. viram chinh in marathi आपण बोलताना आपल्या आवाजाचा चढउतार होतो. पण एखादा उतारा वाचतानाही वाक्यातील चिन्हानुसार वाचतो. बोलणाऱ्याच्या मनातील आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावा हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ती चिन्हे वापरल्याने उतारा सहज वाचता येतो व समजतोही.
उदा. : (viram chinh in marathi)
- हो म्हणजे कोठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. हेच वाक्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिले तर सहजपणे समजते.
- “हो ! ‘म्हणजे कोठे राहता ?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहतो’ म्हणा!
- बाबा ते पाहा भारत ते पाहा त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल.
- “बाबा ! ते पाहा. भारत! ते पाहा. त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल !”
आमचे हे लेख सुद्धा नखीच वाचा :
Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार
वरील वाक्यात चिन्हाचा वापर केल्याने आपण वाचताना कोठे किती थांबावे है समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भाव समजतात. आपण जेव्हा बोलताना थांबतो त्यास ‘विराम’ असे म्हणतात.
आपण बोलताना घेतलेल्या विश्रांतीस्थानास विराम असे म्हणतात. जे विराम ज्या चिन्हाने दाखविले जाते तेव्हा त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.
viram chinh in marathi : विरामचिन्हामुळे आपणास वाक्य कोठे थांबते ? वाक्य कोठून सुरू होते. कोठे किती थांबावयाचे. हे आपणास विरामचिन्हामुळे समजते. म्हणजे विरामचिन्हाचा वापर अत्यावश्यक आहे. विरामचिन्हांच्या सुयोग्य वापरामुळे एखादे वाक्य कोठे सुरू होते, वाक्या कोठे संपते, त्या वाक्यातून कोणती भावना किंवा कोणता भाव प्रकट होतो ते समजते.
बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याच्या ढंगावरून आपण इथे विरामचिन्हे वापरतो… ग्रंथलेखन, पत्रलेखन, शुद्धलेखन, अन्यलेखन, लेखन नियमानुसार विरामचिन्हांचा वापर करून लिहिले जाते. या विरामचिन्हामुळेच त्या वाक्यांना अर्थ प्राप्त होतो. कवीसुद्धा आपल्या कवितेतून आशय स्पष्ट करण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करतात.
आपल्या लेखनात वरचेवर येणारी प्रमुख विरामचिन्हे कोणती, ती केव्हा वापरतात हे थोडक्यात खालील तक्त्यात दिले आहे
आमचे हे लेख सुद्धा नखीच वाचा :
BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?
marathi viram chinh :
चिन्हाचे नाव | चिन्ह | केव्हा वापरतात? | उदाहरण |
पूर्ण विराम | . | वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी | मधू गाणे गाते. |
अर्धविराम | ; | दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडताना | तो खूप घावत होता; पण प्रथम आला नाही. |
स्वल्पविराम | , | एका जातीचे लागोपाठ येणारे शद्व दर्शविताना | सुधा हुशार, सुसंस्कृत, सुशील, मुलगी आहे. |
अपूर्ण विराम | : | वाक्याच्या शेवटी तपशील देताना | या क्रमाने जागेवर बसा: १, २, ३, ४, ५, ६. |
प्रश्नचिन्ह | ? | प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात. | तू कोठे गेला होतास ? |
उद्गारचिन्ह | ! | उत्कट भाव व्यक्त करताना शद्वाच्या शेवटी | अरेरे! काय तुझी ही दशा.. वा! किती छान चित्र आहे. |
अवतरण चिन्ह | “ ” | दुहे पद्धतीने बोलताना त्यांच्या तोंडचे शद्व दाखविताना | ते म्हणाले, “कोण आहे.”तो म्हणाला, “मी जातो”| |
अपसरण चिन्ह चिन्ह (डॅश) | – | बोलताना एखादं वाक्य मध्येच तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास | मी शाळेत पोहचलो पण – राष्ट्रीय एकात्मता- राष्ट्रीय अखंडता |
संयोग चिन्ह | – | दोन शब्द जोडताना | प्रेम-विवाह, शुभ-लाभ |
प्रमुख विरामचिन्हे
chinha in marathi : दोन प्रकार अ) विरामदर्शक विरामचिन्हे, १) अर्थबोधक विरामचिन्हे
पूर्ण विराम (.) : (viram chinh in marathi)
viram chinh in marathi :एखादे विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी किंवा शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी पूर्ण विराम हे चिन्ह वापरतात.
- उदा: राम शाळेला गेला.
- हनुमान रामभक्त होता.
शद्वांचा संक्षेप दर्शविण्यासाठी –
- पु.ल. देशपांडे – पुंडलिक लक्ष्मण देशपांडे.
- ता.क. – ताजा कलम
- स.न.वि.वि. – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
अर्धविराम (;) :
marathi viram chinh :जेव्हा दोन लहान किंवा छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेथे अर्धविराम चिन्ह वापरतात.
- उदा. : १. त्याने सर्व प्रयत्न केले; पण तो अयशस्वी ठरला.
- २. पंतप्रधानांनी पूरग्रस्तांना मदत केली; पण भाषण न करताच परत आले..
स्वल्पविराम (,) : swalpaviram in marathi
swalpaviram in marathi :एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास तसेच वाक्यात थोडेसे थांबावयाचे झाल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात.
- उदा: आई मला वही, पेन, पुस्तक, कंपास आण.
- रूपा म्हणाली. माधवी, इकडे ये.
- शिक्षक म्हणाले. मुलांनो, दंगा करू नका.
आमचे हे लेख सुद्धा नखीच वाचा :
Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
अपूर्ण विराम (:) :
वाक्याच्या शेवटी अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात.
- उदा. : परीक्षेला येताना लागणारे आवश्यक साहित्याची यादी : कंपासपेटी, पेन, पॅड, पट्टी घेऊन या.
- आपल्या शाळेत पुढील विषय शिकवले जातात: हिंदी, मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास इत्यादी.
प्रश्नचिन्हे (?) : viram chinh in marathi
वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरले जाते.
- उदा. :त्या लेखकाचं नाव काय ?
- भारताचा कर्णधार कोण ?
- महिला दिन केव्हा असतो ?
उद्गारवाचक चिन्ह (!) :
आपल्या मनातील भावना किंवा उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जात. (viram chinh in marathi)
- उदा. : ‘शाब्बास !’ शिक्षकांनी त्याची पाठ थोपटली.
- अरेरे! फार वाईट झालं.
- अरेवा ! किती छान चित्र काढलेस तू.
अवतरण चिन्ह (” “) (‘ ‘): (avtaran chinh in marathi)
avtaran chinh in marathi: बोलणाऱ्याचे शद्व जसेच्या तसे दाखविण्यासाठी किंवा विशेष शद्बाला महत्त्व द्यायचे असल्यास अवतरणचिन्ह वापरतात.
- उदा : तो म्हणाला, “मी जातो.’
- मी म्हटलं, “अरे, तू गाडी शिकलास तरी केव्हा आणि कुठ ?”
- मी आणि मर्ढेकर, ‘परिसंवाद’ करीत होतो. ४. विद्यार्थ्यांनी शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ हे नाटक बसवले..
अपसरण चिन्ह (-) :
(viram chinh in marathi): बोलताना किंवा लिहिताना विचारमालिका खंडित झाल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात.
- उदा. : ती विद्यालयीन परीक्षा उत्तीर्ण झाली पण –
- सगळ्यांचा मंत्र एकच राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय अखंडता
संयोग चिन्ह (-) : sanyog chinh in marathi
sanyog chinh in marathi : संयोग चिन्ह अपसारण चिन्हापेक्षा लहान असते. याला विग्रह चिन्ह म्हणून ओळखले जाते. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शद्व अपूर्ण राहिल्यास तो एकच आहे ते सांगण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर करतात.
- उदा.: लग्न सोहळा,
- तुलसी विवाह
- सती-सावित्री,
- चंद्र-तारे..
अभ्यास
अ) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे देऊन वाक्ये पुन्हा लिहा.
- असा लढवय्या पुरुष होणार नाही असे ते म्हणाले..
- वावा काँग्रॅच्युलेशन हो जावईबापू कळलं आम्हाला.
- स्वातंत्र्य लक्ष्मी की जय वंदे मातरम्
- तुझे आहे तुझपाशी। परि तू जागा चुकलासी
- ए अंबाली मी मी सुंदर हिकडं बघ.
- तुला साधे रंग कळत नाहीत ती बाई किंचाळत होती.
- तुझे डोळे किती खोल गेलेत मी म्हणालो काय झालंय रे तुला.
- मी म्हणालो आणि दादानं न्हाईच शिकवलं तर.
- एवढं पैसं एकदम आणायचं कुठनं सदा
- नॉन्सेन्स साहेब ओरडले आणि ताडकन निघून गेले.
ब) विरामचिन्ह म्हणजे काय सांगून त्याचे प्रकार कोणते ते सोदाहरण स्पष्ट करा.
FAQ
मराठी मध्ये एकूण किती विरामचिन्हे आहेत?
मराठी विराम चिन्हांची नावे ? (Names of Viram Chinh in Marathi)
संयोग चिन्ह म्हणजे काय ?
अपसरण चिन्ह म्हणजे काय ?
उदा. : ती विद्यालयीन परीक्षा उत्तीर्ण झाली पण –
सगळ्यांचा मंत्र एकच राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय अखंडता
विराम म्हणजे काय ?
निष्कर्ष
तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला काही टॉपिक आमच्या कडून मिस झाले असतील तर खाली कंमेंट करा आणि आमचे आधीचे लेख वाचायला विसरू नका