Vachan Badla In Marathi | वचन व त्याचे प्रकार

vachan badla in marathi : नमस्कार मित्रानो आज आपण मराठी माध्यम या ब्लॉग वर मराठी भाषेतील व्याकरण वचन बदला पाहणार आहोत जसे स्त्रीच्या सौंदर्याला वेगवेगळ्या अलंकाराने शोभा येते तसे वेगवेगळ्या विचारांनी मराठी व्याकरणाला शोभा येते. जसे लिंगविचार, काळविचार, अर्थविचार आणि आता आपण अभ्यासणार आहोत वचनविचार. (vachan badla)

Vachan Badla In Marathi

marathi vachan : वस्तुच्या रूपावरून किती संख्या याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. वचने ही दोन प्रकारची आहेत.

वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन असे म्हणतात.

पुस्तक = पुस्तक या नामावरून एक पुस्तक आहे हे समजते

पुस्तके = पुस्तके या नामावरून अनेक पुस्तक आहे हे समजते

घर = घर या नामावरून एका घरा आहे हे समजते

घरे = घरे या नामावरून अनेक घरेआहे हे समजते

वचन बदला

वचन बदला शब्द मराठी मित्र या एकवचनाचे अनेकवचन ओळखा.

मित्र = मित्र

वही या एकवचनाचे अनेकवचन ओळखा.

वही = वह्या

विहीर या एकवचनाचे अनेकवचन ओळखा.

विहीर = विहिरी

भिंत या एकवचनाचे अनेकवचन करा

भिंत = भिंती

‘वचना’ बदल विशेष माहिती (Vachan Badla In Marathi)

सामान्यतः सामान्य नामांचेच अनेकवचन होते.

भाववाचक नाम व विशेषनाम शक्यतो एकवचनीच असतात.

काही वेळा भाववाचक नामांचा व विशेषनामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केला जातो तेव्हा अनेकवचन होते.

एखादी व्यक्ती मानाने, नात्याने, अधिकाराने, वयाने मोठी असेल तेव्हा स्था व्यक्तीबद्दल आदरार्थी अनेकवचन वापरले जाते. मराठीत अनेक आदर्श दर्शक शब्द आहेत.

उदा: राव, रावजी, पंत, शास्त्री, आचार्य, शेट, शेटजी, भाई, दास, जी, बा, साहेब, साब वगैरे..

उदा : श्यामराव, श्रीधरपंत, धनपालशेट, गोविंदजी, दादासाहेब, रायबा, पंडितजी वगैरे.

काही शब्द बहुधा अनेकवचनातच आढळतात. उदा. वडील (बाप)

विपुलता, मुबलकता दाखविण्यासाठी एकवचनाचा वापर करतात.

vachan Badlo in marathi जोडपे, त्रिकूट, आठवडा, शत, सहस्र, लक्ष, कोटी, दशलक्ष हे शब्द असे आहेत की, त्यात अनेकत्वाचा बोध होत असला तरी तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जाते. समूह अनेक मानले तर ते अनेकवचनी होतात.

Also read: Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक

मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.

एकवचन

नामावरून एकाच वस्तुचा बोध झाला तर त्यास एकवचन असे म्हणतात जसे पान, वही, फळ, दरवाजा, कागद, पेन, वगैरे.

एकवचनी सर्वनामे : मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण, तू

Also Read: BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?

अनेकवचन

नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्यास अनेकवचन असे म्हणतात जसे : वह्या, खडे, पाने, पाट्या, घरे, फुले, वगैरे (एक वचन अनेकवचन 100 शब्द मराठी)

अनेकवचनी सर्वनामे : आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, ते, ह्या, त्या.

काही पुल्लिंगी शब्द व त्यांची अनेकवचने

एकवचनअनेकवचन
मळामळे
आंबाआंबे
वाडावाडे
कोल्हाकोल्हे
कुत्राकुत्रे
ससाससे
मासामासे
माळामाळे
घोडाघोडे
कावळाकावळे
बगळाबगळे 

अनेकवचनाचे काही नियम

नियम 1 :

‘आ’ कारान्त पुंल्लिंगी शद्वाचे (vachan badla In marathi) अनेकवचन ए कारान्त होते.

एकवचनअनेकवचन
कुत्राकुत्रे 
घोडाघोडे
रस्तारस्ते
राजाराजे
फळाफळे
मासामासे
मळामळे

नियम 2 :

‘आ’ कारान्त पुल्लिंगी शद्वाखेरीज इतर सर्व प्रकारच्या म्हणजे अ,इ / ओ कारान्त मराठी शब्द्वांची रूपे अनेक वचनांत एकवचनाप्रमाणे असतात. (vachan badla In marathi)

शदूएकवचनअनेकवचन
मार्गमार्ग
दिवसदिवस
सैनिकसैनिक
पुत्रपुत्र
मित्रमित्र
‘अ’ कारान्तचोरचोर
तरुणतरुण
वाघवाघ
पोलीसपोलीस
गृहस्थगृहस्थ
राक्षसराक्षस
सोनारसोनार

शदूएकवचनअनेकवचन
रोगीरोगी
शिंपीशिंपी
‘ई’ कारान्तकवीकवी
माळीमाळी
धोबीधोबी
ऋषीऋषी
व्यापारीव्यापारी
पक्षीपक्षी
शदूएकवचनअनेकवचन
गुरूगुरू
खडूखडू
शत्रूशत्रू
ऊ / उ’ कारान्तलाडूलाडू
पेरूपेरू
चिकूचिकू
हेतूहेतू
साधूसाधू
शदूएकवचनअनेकवचन
फोटोफोटो
‘ओ’ कारान्तस्टेरिओस्टेरिओ

रेडिओरेडिओ

नियम 3 : स्त्रीलिंगी शब्द्वांची अनेकवचने

(vachan badla In marathi) “अ” कारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन करताना काहीचे ‘आ’ कारान्त काहीचे ‘ई’ कारान्त तर काहींचे विकल्प्याने दोन्ही प्रकारचे अनेकवचन होते

‘अ’ चे ‘आ’ रूपांतरएकवचनअनेकवचन
(अ)(आ)
माळमाळा
वीटविटा
धारधारा
वेळवेळा
जटजटा
तारीखतारखा
तळतळा
खाटखाटा
खारीकखारका
‘अ’ चे  ‘ई’ रूपांतरएकवचनअनेकवचन
(अ)(ई)
सरसरी
केळकेळी
सहलसहली
बोरबोरी
जास्वंदजास्वंदी
विहीरविहिरी
पंगतपंगती
जातजाती
वरातवराती
पोफळपोफळी
भेटभेटी
भिंतभिंती
‘ई’  चे  ‘या’ रुपांतरएकवचनअनेकवचन
(ई)(या)
भुवईभुवया 
चटईचटया
नदीनद्या 
वाडीवड्या 
लढाईलढाया
समई समया
सुईसुया
रजईरजया
चांदणीचांदण्या
साडीसाड्या
वाडी वाड्या
खाडीखाड्या 
ऊ   चे  ‘वा’ रूपांतरएकवचन(ऊ)एकवचनअनेकवचन
(ऊ)(वा)
ऊवा
सासूसासवा
जळूजळवा
जाऊजावा

नियम 4

काही संस्कृतमधून मराठीत आलेल्या हस्व इकारान्त तत्सम स्त्रीलिंगी शद्वांची रूपे ही अनेकवचनात तशीच राहतात. (vachan in marathi)

ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन संपूर्ण वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते.

नियम 5

‘आ’ कामान्त स्त्रीलिंगी शहांचे अनेकवचन तसेच राहते.

  ‘आ’ कारान्तएकवचनअनेकवचन
प्रार्थनाप्रार्थना
शाळाशाळा
भाषाभाषा
घंटाघंटा
विद्याविद्या
दिशादिशा
आज्ञाआज्ञा
आशाआशा
निंदानिंदा
प्रतिज्ञाप्रतिज्ञा
दिशादिशा

नियम 6

‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी शब्द मराठीत आढळत नाहीत. ‘ई’कारान्त स्त्रीलिंगी अनेकवचन करताना तसेच राहते. नपुंसकलिंग शद्वांचे अनेकवचन (vachan badlo in marathi)

शब्दएकवचनअनेकवचन
‘ई’ कारान्तलक्ष्मीलक्ष्मी
देवीदेवी
युवतीयुवती
तरुणीतरुणी
दासीदासी
शब्दएकवचनअनेकवचन
‘ऊ’  कारान्तवधूवधू
वस्तूवस्तू
वास्तूवास्तू

नियम 7

‘अ’ कारान्त व ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी शद्वांचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.

शब्दएकवचनअनेकवचन
  ‘अ’ कारान्तगावगावे
फळफळे
घरघरे
झाडझाडे
शब्दएकवचनअनेकवचन
‘उ/ऊ’  कारान्तवासरूवासरे
पाखरूपाखरे
पिलूपिल्ले 
लिंबूलिंबे

नियम 8

Vachan in marathi ‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी शब्दांचे अनेकवचन ‘इ’ कारान्त होते.

शब्दएकवचनअनेकवचन
‘ए’ चे  ‘इ’ कारान्तगानेगाणी
तळेतळी 
डोकेडोकी
मडकेमडकी
खेळणेखेळणी
केळेकेळी

जेव्हा एखादी व्यक्ती आदरणीय असेल तेव्हा अनेकवचन वापरतात.

उदा. संत ज्ञानेश्वरांना, शिवाजी महाराजांनी, गांधीजींकडे इ.

FAQ

वचनाचे प्रकार किती आहे ??

वचनाचे दोन मुख्य प्रकार पडतात एक म्हणजे एकवचन आणि अनेकवचन

वचन म्हणजे काय ?

वस्तू एक आहे कि अनेक आहे हे त्याच्या नामा वरून समजते त्याला नामाचे वचन असे म्हणतात

एकवचन म्हणजे काय ?

नामावरून फक्त एकाचा बोध झाला त्याला आपण एकवचन असे म्हणतो नामाचे जे मुळ रूप असत तेच एकवचन असत

अनेकवचन म्हणजे काय ?

नामावरून अनेकांचा बोध झाल्यास आपण त्याला अनेकवचन असे म्हणतो

वचन बदला मित्र

मित्र

निष्कर्ष


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला या लेखा मधेय काही मुद्दे राहिले असतील किंवा आपल्याला नवीन काही सुचवायचे असेल तेर खाली कंमेंट सेकशन मधेय तुमचे मत देयला विसरू नका आणि आमचे मागचे लेख वाचायला विसरू नका


जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *